पंढरपूरमध्ये एकादशीचा आनंद मिळतो त्याच प्रकाराचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला
ज्याप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये वारी अनुभवायला मिळते त्याच प्रकाराचा अनुभव आज बेळगाव मध्ये पाहायला मिळाला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रीत येत कुर्ता पायजमा तसेच मुलींनी साडी घालून या वारीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ही वारी चव्हाट गल्ली, सोन्या मारुती ,फोर्ट रोड ,चव्हाट गल्ली त्यानंतर शाळेमध्ये पोचली यावेळी विद्यार्थ्यांनी जुम्मा, फुगडी खेळली आणि ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये एकादशीचा आनंद मिळतो त्याच प्रकाराचा आनंद शाळेमध्ये अनुभवला.
जिजामाता हायस्कूल सेंट्रल हायस्कूल आणि मराठा मंडळ हायस्कूल या तीनही शाळेच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये वारी काढण्यात आली आणि एकादश साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनी देखील या वारीचा आनंद लुटला. यावेळी बोलताना जिजामाता शाळेचे मुख्याध्यापक एन डी पाटील म्हणाले की पहिल्यांदाच अशा प्रकारची वारी शाळेमध्ये अनुभवायला मिळत असल्याने खूपच आनंद झाला.
तसेच ही वारी यशस्वी करण्याकरिता मराठा मंडळ च्या अध्यक्षा राजश्रीताई नागराजू हलगेकर यांनी खास प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर संचालक मंडळाने विश्वस्त मंडळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन त्याचबरोबर पालकांनी केलेले सहकार्य त्यामुळे ही वारी यशस्वीरित्या पार पाडल्या असल्याचे सांगितले.
तसेच दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकरीता भजन गवळण भारुडाचे कार्यक्रम त्याचबरोबर एक छोटा कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापकांनी दिली.