*सीमाभागातील चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी मराठी भाषिकांनी पाठीशी राहून एकनिष्ठतेने उमेदवार निवडून आणावे : शिवसेना संपर्कप्रमुख श्री. अरविंदजी नागनुरी*
*राजू चौगुले – ग्रामीण, रमाकांत कोंडुसकर-दक्षिण, ॲड. अमर येळूरकर – उत्तर, खानापूर – मुरलीधर पाटील, मारूती नाईक – यमकणमर्डी व निपाणी* शिवसेनेने दर्शविला जाहीर पाठिंबा
__________________
बेळगाव तारीख (25): मराठी भाषेचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बेळगाव सीमा भागामध्ये अनेक हुतात्म्याने बलिदान दिलेले आहे त्यांचे स्मरण करत त्यांचे बलिदान आम्ही कदापी वाया जाऊ देणार नाही. मराठी भाषिकांच्या वरती वारंवार होणाऱ्या अन्यायावर आम्ही सडकून प्रत्युत्तर देऊ. यासाठी बेळगाव सीमा भागामध्ये मध्यवर्ती एकीकरण समितीच्या वतीने अधिकृत उमेदवारांना निवड कमिटीने निवडून दिलेले आहे त्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहिर करत उमेदवार निश्चितच निवडून येतील यासाठी आम्ही सतत कार्यशील राहू. जागरूकतेने कार्य करू. सीमा भागातील चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्तानी समितीच्या पाठीशी राहून एकनिष्ठतेने उमेदवार निवडून आणण्यासाठी जागृतकतेने कार्य करू. तळमळीने कार्य करून राखून दृढ निश्चयाने निवडून नक्कीच आणू असे प्रतिपादन बेळगाव सीमा भागातीलसह शिवसेना बेळगावचे संपर्कप्रमुख श्री अरविंदजी नागनुरी मराठी वाढीसाठी प्रयत्न करणारच असेल सांगितले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अभियंता राजू चौगुले यांना शिवसेना सीमाभाग बेळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बेळगाव त्यांच्या वतीने बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार अभियंता श्री राजू चौगुले – ( आर एम चौगुले ) बेळगाव, दक्षिण मधील अधिकृत उमेदवार श्री रमाकांत दादा कोंडुसकर, बेळगाव उत्तर मधील अधिकृत उमेदवार ॲड. अमर येळूरकर, खानापूर येथील समितीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधर पाटील, यमकण मर्डी मधील अधिकृत उमेदवार मारुती नाईक तसेच निपाणी येथील अधिकृत उमेदवार यांना शिवसेनेच्या वतीने भरघोस जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवसेना खंबीरपणे या सर्व उमेदवारांना आपला बहुमलाचा पाठिंबा जाहीर केला आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून नक्कीच आमदार करणार असे आश्वासन देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवर मंडळींची भाषणे झाली. यावेळी सीमा भागातील सर्व समितीचे उमेदवार निवडून यावे यासाठी शुभेच्छा दिल्या. समितीच्या उमेदवारांनी शिवसेनेचे आभार मानले.
यावेळी सह संपर्कप्रमुख शिवसेना बेळगावचे श्री अरविंदजी नागनुरी, बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोरले, बेळगाव शहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, प्रदीप सुतार महिपाल चित्तापाचे नागेश देसुरकर शिवा केरवाडकर रामचंद्र मोदगेकर, सुरेश राजूकर माजी महापौर शिवाजी सुंठकर प्रकाश शिरोळकर अशोक चौगुले यांच्यासह शिवसेनेचे आणि समितीचे पदाधिकारी सदस्य आणि एकनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________