महिला विद्यालय हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यािंनींचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न
महिला विद्यालय हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री विश्वजीत हसबे सर विद्यार्थिनी पंतप्रधान कु. रिद्धी गावडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला शालेय विद्यार्थिनींनी शालागीत व स्वागत गीत सादर केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व त्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर यांनी केले. इयत्ता सातवीच्या व नववीच्या विद्यार्थ्यांनीनी आपल्या दहावीच्या दीदींना निरोप दिला. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यािंनींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी मनोगताद्वारे व्यक्त केल्या. शालेय विद्यार्थिनींनी निरोप गीत सादर केले. शिक्षकांच्यावतीने सहशिक्षिका श्रीमती अस्मिता देशपांडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यािंनींना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विश्वजीत हसबे सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये विद्यार्थिनींना अभ्यासाचे महत्त्व सांगून भविष्य ज्ञानाने उज्वल करा असा संदेश दिला खूप छान ओघवत्या शैलीत त्यांनी मुलींशी संवाद साधला.
कार्यक्रमात प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती रेखा नागण्णावर यांनी केले. आभार कु. अक्षता पावशे हिने मानले. कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर यांचे प्रोत्साहन लाभले