This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

कोगनोळी येथे फिल्मी स्टाईलने दरोडा.. लाखों रुपयाचे ऐवज चोरट्यांनी केले लंपास…

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोगनोळी येथे फिल्मी स्टाईलने दरोडा.. लाखों रुपयाचे ऐवज चोरट्यांनी केले लंपास…

 

कोगनोळी ता. निपाणी येथे फिल्मी स्टाईलने अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून लाखो रुपयाचे ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी दि. आठ रोजी मध्यरात्री घडली आहे. यामुळे कोगनोळी व परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत अधिक माहिती अशी की येथील कोगनोळी – हणबरवाडी रोडवर सी वाय पाटील यांचे घर असून शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात सशस्त्रासह असणाऱ्या चोरट्यांनी सी वाय पाटील यांच्या घरात मागील बाजूने कडी कोयंडा मोडून प्रवेश केला. स्वयंपाक घरात प्रवेश केल्यानंतर काही वस्तूंची मोडतोड करून काही वस्तू घेतल्यानंतर सशस्त्रासह असणाऱ्या चोरट्यांनी दुसऱ्या खोलीत प्रवेश करून घरमालक सी वाय पाटील यांना जबर मारहाण केल्याचे समजते. यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी घरात होती. घरमालक यांना मारहाण करतेवेळी त्यांची मुलगी ऐश्वर्या घोरपडे आपल्या वडिलांना मारताना करताना पाहून सोडवण्यासाठी गेली असता तिला देखील अज्ञात चोरट्याने बेदम मारहाण केली. आणि सशस्त्राचा धाक दाखवून घरातील काही रोख रक्कम आणि 30 तोळे सोन्याचे ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातून पळ काढल्यानंतर घरातील नागरिकांनी घराबाहेर येऊन आरडाओरड केली. यावेळी शेजरांच्या ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ जखमी झालेल्या व्यक्तींना कागल येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. सकाळपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने कोगनोळी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती पोलिसांना समजतात निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि चिक्कोडी डीवारएसपी बसवराज यलगार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.यावेळी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. चित्रा या श्वानने घटनास्थळापासून हणबरवाडी रोडवर असणाऱ्या ढोबळे पानंद येथील अशोक मगदूम यांच्या शेतापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला.

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now