चलवेनहट्टी येथे पावसा अभावी पिके लागली करपायला
गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्याने अखेर पीक करपायला लागले आहेत बटाटा भात सोयाबीन भुईमुंग मक्का रताळी यासह सर्वच पिकांनी मान टाकली आहे पावसाला आज सुरुवात होईल उद्या सुरुवात होईल या आशेवर नजर लावून बसलेला बळीराजाची खूप दयनीय अवस्था झाली असून शेतकरी वर्गाचे पुरते आवसान गळाले आहे ज्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप सेट आहेत त्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याकारणाने त्या शेतकऱ्याची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे
तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुध्दा ऐरणीवर आला आहे त्यामुळे बळीराजा मोठ्याआर्थिक संकटात सापडला असून हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी चलवेनहट्टी अगसगे हंदिगनूर कडोली केदनुर या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे