बेळगाव प्रादेशिक वनविभागात एन. ई. क्रांती यांनी डीसीएफ पदाचा कार्यभार स्वीकारला
बेळगाव : बेळगाव प्रादेशिक वनविभागात नवे उपवनसंरक्षण प्रमुख (डीसीएफ) म्हणून आयएफएस अधिकारी एन. ई. क्रांती यांनी पदभार स्वीकारला आहे. याआधी कार्यरत असलेले डीसीएफ मरिया क्रिस्तु राजा डी. भा.अ.से. यांची बदली झाल्यानंतर हा बदल करण्यात आला.
२०१५ च्या बॅचचे अधिकारी असलेले एन. ई. क्रांती यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “बेळगाव विभागातील वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि वनसंवर्धनाशी निगडित उपक्रमांना अधिक प्राधान्य दिले जाईल. जंगल व जैवविविधतेचे रक्षण हा आमचा सर्वोच्च हेतू असेल.”
वनविभागातील अधिकाऱ्यांनी नवीन डीसीएफ यांचे स्वागत केले असून स्थानिक पर्यावरणप्रेमी व कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या कार्यकाळाबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.