बेळगाव मधील अनगोळ येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यावरून दोन गटात मतभिन्नता झाल्याने वातावरण तंग असून तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनगोळ येथील स्थानिक रहिवाश्यांनी पुतळ्याच्या आजूबाजूचे काम अद्याप पूर्ण झाले नसून रविवारी अनावरण करू नये अशी भूमिका घेतली आहे.तर आमदार अभय पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत रविवारी सायंकाळी छञपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार अशी भूमिका आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी अनगोळ येथे भेट देऊन नागरिकांची बैठक घेतली.पुतळ्याच्या अनावरणाची तारीख नंतर जाहीर केली जाईल.महानगरपालिका या संबंधी आवश्यक ती तयारी करेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.पण आमदार अभय पाटील यांनी रविवारी सायंकाळी पुतळ्याचे अनावरण करणार अशी भूमिका घेतल्याने पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.