गौरी लंकेश प्रकरणात काम पाहणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा ! – रायबाग आणि बेळगाव येथे निवेदन
रायबाग (जिल्हा बेळगाव) – गौरी लंकेश प्रकरणात काम पाहणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा, तसेच अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना सशस्त्र पोलीस संरक्षण द्या, या मागणीसाठी पोलीस महासंचालकांच्या नावे असलेले निवेदन रायबाग तहसीलदार यांना देण्यात आले. या वेळी अधिवक् ता महेश तेली, श्रीराम सेवा बेळगाव जिल्हाउपाध्यक्ष श्री. शिवानंद बांते, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. आप्पासाहेब पवार यांसह अन्य उपस्थित होते.
हेच निवेदन बेळगाव येथे तहसीलदार मंजुनाथ जानकी यांना देण्यात आले. या प्रसंगी अधिवक्ता शामसुंदर पत्तार, अधिवक्ता हेमराज बेच्चान्नावर, अधिवक्ता शंकर बाळनाईक, अधिवक्ता चिदंबर होनगेकर, अधिवक्ता जोतिबा पाटील, अधिवक्ता कुमार इतगेकर, धर्मप्रेमी सदानंद मासेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर उपस्थित होते.