बेळगाव पोलीस आयुक्तपदी आय जी पी एस.एन.सिद्दरामप्पा यांची नियुक्ती
बेळगाव पोलीस आयुक्तपदी आय जी पी एस.एन.सिद्दरामप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते.पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यास विलंब झाल्याने पोलीस आयुक्त पदाचा देखील तात्पुरता पदभार उत्तर विभागाचे आय जी पी विकास कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
बेळगावच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्यास बरेच अधिकारी अनुत्सुक होते.भाषिक वाद आणि जिल्ह्यातील राजकारण यामुळे आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारण्यास अनेक जणांनी नकार दिल्याची देखील चर्चा होती.अखेर सरकारने वरिष्ठ आय पी एस अधिकारी एस.एन.सिद्दरामप्पा यांची बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश बजावला आहे.एस.एन.सिद्दरामप्पा हे २००५ च्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत.यापूर्वी ते बंगलोर येथे पोलीस मुख्यालयात सेवा बजावत होते.