मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास उमेदवाराचा विजय निश्चितच
कर्नाटक राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. अशा मतदार संघातून राष्ट्रीय पक्षाने मराठा समाजाला उमेदवारी दिल्यास उमेदवार निश्चितच निवडून येईल आणि मतदारसंघातील मराठा समाजाच्या लोकांना नैतिक न्याय मिळेल असे मराठा समाजाचे जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी ( बेंगलोर) यांनी म्हटले आहे.
कर्नाटक राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात मराठा समाज बहुसंख्येने आहे. याचा गांभीर्याने विचार करून मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांनी, मराठा समाजातील व्यक्तीस उमेदवारी दिल्यास ती व्यक्ती निवडून येईल. यामुळे पक्षातील विजयी उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल. शिवाय त्या मतदारसंघातील मराठा समाजातील लोकांना सामाजिक, आर्थिक, भाषिक आणि शैक्षणिकरित्या सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल, असेही जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी म्हटले आहे.
राज्यभरात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाची म्हणावी तशी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, औद्योगिक प्रगती झालेली नाही. अशा समाजाला मराठा प्रतिनिधी मिळाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असेही जगद्गुरू वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी म्हटले आहे.