यंदा प्रचंड उकाडा असेल तर पाऊस कमीच
यंदा प्रचंड उकाडाअसेल , तर पाऊस मात्र कमीच राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आणि हा अंदाज सध्या खरा ठरत आहे .वाढलेल्या उष्णतेनं अंगाची लाहीलाही होत आहे.
पुढच्या काही दिवसांत आणखी उष्णता वाढणार आहे .या मागच कारण एल नीनो असल्याच शास्त्रज्ञांनी म्हणटल आहे .भारतासह जगातील अनेक देशही वाढत्या उष्णतेमुळे हैराण आहेत. मे महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस दिलासा देणारे होते, पण त्यानंतर उष्मात वाढ झाली .
एल-निनो’ (El-Nino) म्हणजे काय आहे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याच उत्तर हे असे आहे .समुद्रात उसळणार उष्ण लाटा
अमेरिकन स्पेस एजन्सी नासानं आपल्या सेंटिनेल-6 मायकेल फ्रिलिश उपग्रहातून पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा वाहत असल्याचं पाहिलं आहे. याच लाटांचं रुपांतर एल-निनो मध्ये होत असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. त्यांना ‘केल्विन लहरी’ म्हणतात
या लाटा फक्त 2 ते 4 इंच उंचीच्या आहेत. पण त्यांची रुंदी हजारो किलोमीटर आहे.हे नासाने अंतराळ मधून छायाचित्र टिपलं आहे .
जर हि परिस्थिती अशीच राहिल्यास त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होईल एल-निनो परिणाम चालू मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ देखील पडू शकतो