वर्षभरात कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त केला : तो मूळ मालकाला केला परत
वर्षभरात बेळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कामगिरी केली असून या वर्षभराच्या काळात कोट्यवधीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे. या वर्षात पोलिसांनी 301 गुन्हे उघडकीस आणले आहेत.तसेच या गुन्हे प्रकरणे पोलिसांनी 324 आरोपींना अटक केली असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार यांनी दिली.
https://fb.watch/hs2NqFDUq6/
आज शहरात बेळगाव जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने प्रॉपर्टी रिटर्न परेड चे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार परिषदेत आयजीपीनी कोणकोणत्या घटनेत आरोपींनी नागरिकांना फसवले होते याबद्दल सविस्तर माहिती.
तसेच वेगवेगळ्या गुन्हात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकाला खात्री जमा करून परत केला. शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या चोरी घरफोडी तसेच फसवणूक अशा विविध प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आणि यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून घेतला.
यावेळी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्हात जप्त केलेल्या मुद्देमाल पोलीस ग्राउंड येथे प्रदर्शनात मांडला होता. तसेच चोरी प्रकरणी पोलिसांनी जो पैसा जप्त केला होता तो देखील त्यांनी पो प्रॉपर्टी रिटर्न परेड मध्ये ठेवला होता.
पोलिसांनी सर्वत्र आपले जाळे विणवत त्यांच्याकडून कशाप्रकारे मुद्देमाल जप्त केला याची माहिती दिली यावेळी एकूण 17 कोटी 54 लाखांचा मुद्देबाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणांमध्ये 4 कोटी 18 लाख , किमतीचे आठ किलो 369 ग्रॅम सोने , 4 लाख 91 हजार किमतीची 7 किलो चांदी , 1 कोटी 24 लाख रु . किमतीच्या दुचाकी , 3 कोटी 99 लाख रु . किमतीची 24 मोटार वाहने जप्त करण्यात आली आहेत .त्याच प्रमाणे , 7 कोटी ४७ लाखांची रोकड , 59 लाख रु . किमतीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे .
बेळगाव मधील डी आर मैदान येथे या जप्त केलेल्या मुद्देमालाचे पोलीस खात्याकडून प्रदर्शन भरवण्यात आले असून , मूळ मालकांना त्यांचे दागिने आणि वस्तू हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती एस पी संजीव पाटील यांनी दिली .