*ठाकरे यांच्या शिवसेनेत सिमाभागात इनकमिंग जोरात; तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या उपस्थित बेळगाव शहर परिसरातील शेकडो कार्यकर्ते शिवबंधनात*
ता. ३१ जानेवारी २०२३
:- महाराष्ट्रात जरी शिवसेनेत दोन गट झाले तरी देखील सिमाभागात ठाकरे गटाकडे जोर कायम राहिलेला आहे. आज ठाकरे गटात सिमाभागातील विशेष करून तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्राणीन मधून अनेक कार्यकर्त्यांनी मोठा पक्षप्रवेश झाला. आज टिळक चौक येथील येथे आयोजित उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर
उप तालुका प्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, चंद्रकांत कुंडुसकर,युवासेना प्रमुख विनायक हुलजी, आकाश डुकरे यांच्या उपस्थितीत बेळगाव शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
तालुका प्रमुख सचिन गोरले व उप शहर प्रमुख राजू तुडयेकर यांच्या परिषरामाने नवीन कार्यकर्त्यांना यांना पक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.
शिवबंधन म्हणजे हा एक धाका नसून राजा शिव छत्रपती एक रक्षक कड आहे. मा. शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कठोर परिश्रम द्वारे या भगव्या झेंड्याचे व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या शिवसेना पक्षाच्या च्या माध्यमाधून केले. बाळासाहेब ठाकरे प्रत्येक गोष्ट शिव छत्रपती महाराज यांच्या शिवचरीत्र तातोतंत पालन करत समाज्याचे कार्य केले आहे. तसेच युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शौर्य अंगी विचारांना देत आपले कार्य केले पाहिजे. बाळासाहेब यांनी महाराष्ट्र जशी संघटना मजबूत केले तसेच कार्य सिमाभागातील नवीन कार्यकर्त्यांनी हाती घेतले पाहिजे केले पाहिजे असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले ‘ शिव सेना जोमाने आता कार्य हाती घेणार आहे प्रत्येक गावा गावात आपले संघटना पोहचली पाहिजे. आपल्या प्रदेशात शिव सेना मजबूत करणे बरोबरच मराठी भाषेचे रक्षणाचे कार्य केले पाहिजे. येणार्या कार्यात शिव सेना ही सामाजिक बरोबर राजकारणात काम हाती घेणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.