बेळगांव:”हम दो हमारे १२” या चित्रपटाला विरोध करत एसडीबीआय संघटनेच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करण्यात आली.
७ जून रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणाऱ्या “हम दो हमारे १२”हा चित्रपट मुस्लिम बांधवांच्या भावनांना दुखावणारा चित्रपट आहे यामुळे आज कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे एसडीपीआय तसेच मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी या चित्रपटाचा विरोध करत निदर्शने केली.
या चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशातील शांतता भंग होऊ शकते. यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मुस्लिम संघटना तसेच एसडीपीआयच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली.
या चित्रपटात इस्लाम धर्माविषयी चुकीची माहिती पसरवून समाजात द्वेष निर्माण होईल असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.कुराणातील श्लोक चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आले आहेत. याशिवाय इस्लाम हा असहिष्णु धर्म असल्याचे दाखवण्यात आले आहे.या चित्रपटामुळे समाजातील एकुपा बिघडण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजाविरुद्ध हिंसाचार भडकवण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.