कर्नाटक राज्य बागायत खाते तर्फे राज्यातील बागायत क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्या अनुषंगाने काल शहरातील हुमन पार्क येथे बागायत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी या बागायत खात्यात च्या उद्घाटनाला खासदार मंगला अंगडी उत्तरचे आमदार राजू सेठ जिल्हाधिकारी नितेश पाटील जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर जिल्हा बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरुगोड उपस्थित होते.
यावेळी या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार मंगलां अंगडी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बागायत खात्याच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
या बागायत महोत्सव हा प्रदर्शनाकरिता आणि विक्री करिता असून यामध्ये विविध फळा भाज्या प्रजातीची रूपे एकाच छताखाली पहावयास असून प्रमुख मान्यवरांना प्रदर्शनाची पाहणी केली.
सदर बागायत महोत्सव हा तीन दिवस चालणार असून 25, 26 आणि 27 रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांना खुले असणार आहे या बागायत महोत्सवामध्ये बारा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत रोपे आणि झाडे उपलब्ध असून नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.