बेळगाव, प्रतिनिधी –
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारी, २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच इयत्ता १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले असून, पालकांनीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.