बेळगाव: बागलकोट जवळील एम.आर.एन (निरानी) आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नुकताच झालेल्या राज्यस्तरीय शारीरिक विचार 2024 संमेलनामध्ये बेळगाव KLE श्री बी.एम.कणकणवाडी आयुर्वेद विद्यापीठाचे प्राध्यापक व फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ.महांतेश रामण्णावर यांनी आपल्या वडिलांच्या देहाचे विटंबन करून वैद्यकीय क्षेत्र दानाचे दूत, आयुर्वेदिक वैद्यकीय अध्यापन सेवा,शरीरदान, अवयवदानाची जनजागृती करण्याची निस्वार्थ सेवा केली आहे. त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना “शारीरिक रत्न 2024 पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आले.
याप्रसंगी राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे, संचालक एम आर.एन.नीराणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे कार्यकारी संगमेश निराणी तेजस इंटरनॅशनल एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा माधुरी मुधोळ, डॉ गणेश पुतूर, एम आर एन कॉलेज प्राध्यापक डॉ प्रल्हाद गंगावती, डॉक्टर शिवकुमार गंगाल, डॉक्टर मुरूलीधर बडगे उपस्थित होते.
डॉ.रामण्णवर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केएलई आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार शेट्टी, शिक्षक व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.