प्रामाणिक रिक्षा चालकाचा ‘सेंट जोसेफ कॉव्हेन्ट शाळेकडून सत्कार
अर्जुन जैन यांचे अडीच लाख रुपयाची बॅग अनंत होसुरकर यांना मिळाली होती. यांनी दाखवलेल्या प्रामाणिक बद्दल शनिवारी सकाळी 11 वाजता सेंट जोसेफ शाळेच्या सभागृहात शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी इब्राहिम व सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेचे माजी पि. टी. ए.सदस्य तसेच
सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते रिक्षाचालक अनंत शंकर होसुरकर याचा सत्कार करण्यात आला.
सेंट जोसेफ शाळेची वर्दी करणारे अनंत होसुरकर यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर पडलेले पैसे होसुरकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन परत केले. असलेल्या हजारो रुपयांच्या रकमेला हात न लावता रिक्षा चालक अनंत यांनी हा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रामाणिक रिक्षाचालक अनंत याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेचे माजी पि. टी. ए. सदस्य यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श निर्माण व्हावा अशी कृती आपल्या संबंधित असणारे सेंट जोसेफ शाळेची वर्दी करणारे अनंत होसुरकर यांनी आपल्या समोर ठेवली आहे. मतलबी झालेल्या दुनियेत प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला आहे. चंगळवादी संस्कृतीने माणसातील माणूसपण हरवला जात आहे या पार्श्वभूमीवर तथाकथित सामान्य कुटुंब म्हणता येईल अशा आर्थिक स्थितीत असणाऱ्या अनंत होसुरकर यांनी माणसाचं जगणं हे लोभावर अवलंबून नसून निष्ठेवर अवलंबून असते हे सिद्ध करून दाखवलं आहे. लोभ व्हावा अशी एक रक्कम त्यांच्या हातात आली असतानाही त्यांनी प्रामाणिकपणे परत करून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला समाज घडतो तो अशाच व्यक्तींच्या जीवावर समाज बिघडविण्याचे काम अनेकजण करतात अशा व्यवस्थेत समाज टिकला तो श्री अनंत यांच्यासारख्या व्यक्तींच्यामुळे जगण्यावर व माणसाच्या हसण्यावर नैतिकतेचे मोहर उठून होसुरकर यांनी मानवतेच्या महावस्त्राला सौंदर्याची किनार जोडली आहे. या आदर्श व्यक्तीकडून अनेक गोष्टी शिकू शकतो त्यांच्यातला हा प्रामाणिकपणा गुण प्रत्येकाने आपल्यात बनवावा अशी इच्छा व्यक्त करतो. असे उपस्थितांना सांगितले.
यावेळी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेचे पि. टी. ए.उपाध्यक्ष संतोष गावडे परवेझ किणीकर,सुनील जाधव सतीश कलघटगी, नाझणीन सौदागर,सोनाली खोत,पराग चंदगडकर,तोफिक सय्यद, इरफान मुल्ला, पूर्वा सरनोबत,सविता खोत,प्रवीण मोदळ,शशिकांत मेलवनकी तसमीन मुल्ला,पवित्रा पुजारविनोद दबाळे,विशाल पाटील, यासह अन्य पालक उपस्थित होते.