बेळगाव :जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी बँकच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बसवराज रायवगोळ तर उपाध्यक्षपदी श्रीकांत बुडाप्पा हैगर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बँकेच्या १०० वर्षाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा ५ वर्षासाठी निवडून आलेले बसवराज रायवगोळ पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. तर निंगणगौडा रमणगौडा पाटील,किरण सोमलिंगप्पा तोरगल्ल,बसवराज फकीरप्पा कोंडीकोप्पा,दुंडप्पा शंकर वाटगुडे,हेमंतगौडा सिद्धानगौडा पाटील,बाबू बालचंद्र सुतार,महेश मल्लिकार्जुन हिरेमठ,गिरीजा कल्लाप्पा पडसलगी,गीता कल्लाप्पा तलवार यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा विविध संघटनांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मल्लेश चौगले, सिद्राय मेत्री, संतोष कांबळे, डॉ. ए.डी.मोकाशी, विश्वनाथ थेराडळकर, रवी बस्तवाडकर, मल्लेशा कुरंगी, यल्लाप्पा कोलकार,आकाश हलगेकर, दिपक केतकर, सुनिल कोलकार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.