निप्पणी:हिंदू हेल्प लाईन निपाणी, विश्व हिंदू परिषद दिले वनराला जिवदान तवंदी गावाशेजारी एन एच फोर च्या रोड जवळ हिंदू हेल्प लाईन चे कार्यकर्ते सुमित पाटील यांना वानर जखमी अवस्थेत आढळून आले यावेळी या वानराला कुत्र्याचा झुंड त्रास देत होता. यावेळी हिंदू हेल्प लाईन चे कार्यकर्ते सुमित पाटील यांनी कुत्र्याच्या झुंडी पसून वानराला सोडवून या वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि मदती साठी हिंदू हेल्प लाईन चे सागर श्रीखंडे यांना संपर्क केला यावेळी सागर श्रीखंडे यांनी निपाणी येथील फॉरेस्ट खात्याचे अधिकारी यांना ही माहिती दिली आणि मदती साठी विनंती केली
व निपाणी येथील सरकारी पशुैद्यकीय अधिकारी प्रतीक जी यांना घेवून घटने शेजारी धाव घेतली यावेळी संकेश्वर येथील फॉरेस्ट अधिकारी राजू पाटील आणि सहकारी व हावे पेट्रोलियमचे अधिकारी आणि सहकारी हे ही घटने शेजारी पोहचले यावेळी हिंदू हेल्प लाईन चे शुभम पाटील व सागर श्रीखंडे यांनी जखमी वानरास पकडून वैद्यकीय अधिकारी प्रतीकजी यांनी त्या वानरावर उपचार केले व हावे पेट्रोलच्या गाडीमधून संकेश्वर येथील फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीमध्ये पुढील उपचारासाठी घेऊन गेले यावेळी फॉरेस्ट अधिकारी राजू पाटील यांनी सांगितले की वैद्यकीय अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली या वानरावर उपचार केले जातील
व नंतर याला जंगलामध्ये सोडून देण्यात येईल यावेळी यावेळी निपाणी, संकेश्वर फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच निपाणीतील सरकारी वैद्यकीय अधिकारी तसेच हावे पेट्रोलचे अधिकारी अक्षय सारपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शन खाली चालणाऱ्या हिंदू हेल्प लाईनच्या वतीने शेकडो जखमी प्राण्यांवर उपचार केले आहेत यावेळी सुमित पाटील, राजेंद्र गुरव, बाबासाहेब पाटील, राहुल कदम, सागर श्रीखंडे, यांनी वानरास जिवदान दिले.