हिंदी भावना अभिव्यक्तीची भाषा – डॉ. डी . एम . मुल्ला
बेळगाव येथील छावणी परिषदेच्या राजभाषा कार्यावयन समिती तर्फे हिंदी दिनाच्या निमित्ताने “हिंदी पखवाडा” साजरा करण्यात येत आहे. या पखवाडाचे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. डी .एम .मुल्ला हे उपस्थित होते . यावेळी छावणी परिषदेचे कार्यालय अधीक्षक एम .वाय .तालुकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक बिर्जे यांनी सविस्तर हिंदी पखवाडाची माहिती प्रस्तुत करून उपस्थितांचे स्वागत केले. या पखवाड्यात विद्यार्थ्यांच्या साठी भाषण आणि निबंध स्पर्धा, कार्यालयातील कर्मचारी वर्गासाठी सुलेखन, अनुवाद, भाषण, हिंदी टंकलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी भरत कुरी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि युनूस आत्तार यांनी रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचा हिंदी दिनाचा संदेश वाचून दाखविला.
प्रमुख अतिथी पदावरून बोलताना डॉ. डी . एम . मुल्ला म्हणाले की, हिंदी भाषा ही हृदयाच्या कोशातून गोडवा घेऊन निघते . या भाषेतून भावना अभिव्यक्ती उचित प्रकारे करता येते ज्यामुळे मन आणि मस्तीष्क समाधान होऊन मनुष्याला आनंदाची खरी प्राप्ती होते.माणसांच्या मध्ये एकता निर्माण करणारी भाषा म्हणजेच हिंदी . मनुष्याने या भाषेचा मना पासून स्वीकार केला पाहिजे.
यावेळी एम .वाय . तालुकर यांनी हिंदी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला छावणी परिषदेचे अनेक विभागिय कर्मचारी , मुख्याध्यापक , शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बिर्जे यांनी केले . शेवटी उदय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला सफल बनवण्यासाठी सतीश गुरव यांनी मोलाचे कष्ट घेतले.
F*ckin’ remarkable things here. I’m very glad to see your article. Thanks a lot and i am looking forward to contact you. Will you please drop me a mail?
Thankyou for this wondrous post, I am glad I detected this internet site on yahoo.
Wonderful work! This is the type of info that should be shared around the web. Shame on the search engines for not positioning this post higher! Come on over and visit my site . Thanks =)