हिंदी उद्योग जगताची भाषा – प्रा .अर्चना भोसले
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य , विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस साजरा करण्यात आला . हिंदी दिवसाच्या शुभ अवसरा वर “हिंदी आंतरराष्ट्रीयता की ओर” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला वक्ता च्या रूपाने वाणिज्य विभागाच्या प्रा.अर्चना भोसले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डाँ.एच.जे. मोळेराखी यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी विभाग प्रमुख डॉ . डी. एम. मुल्ला यांनी हिंदी विषयाची विशेषता सांगून उपस्थितांचे स्वागत केले . त्यानंतर प्रमुख वक्ता या नात्याने बोलताना प्रा .अर्चना भोसले म्हणाल्या की , हिंदी भाषा आज सीमा पलीकडे पोहचली आहे , विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे . हिंदी केवळ बोली म्हणून नाही तर ती उद्योग आणि वाणिज्य जगताची भाषा बनली आहे. या भाषेमुळे उद्योग जगताला उज्वल रूप प्राप्त झाले आहे .
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डाँ.एच .जे .मोळेराखी म्हणाले की , हिंदीचा साहित्य विपुल आहे . हिंदी भाषा आणि हिंदी साहित्य हृदयाच्या जवळ असल्यामुळे ती माणसा – माणसाला माणुसकी च्या नात्याने जोडण्याचे कार्य करते . या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून प्रा . मनोहर पाटील उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा .भाग्यश्री चौगले यांनी केले . या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते .