बेळगाव: माळ मारुती पोलिसांची मोठी कारवाई छापा टाकून १०६२०० रुपये किमतीचे हिरोईन जप्त केले.
गुरुवार दिनांक २८/११/२०२४ रोजी माळ मारुती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशोक नगर येथील फुल मार्केट जवळ बागेश बलराम नंदाळकर रा.बसवाण गल्ली हा हेरॉईन विकण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बागेश बलराम नंदाळकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३६.१६ ग्रॅम हिरोईन सापडले.
याची किंमत १०६२०० रू इतकी आहे. पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त (C&S) पोलीस उपयुक्त (गुन्हे व वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.नंदीश्वर कुंबर, पीआयसीबी बेळगाव नगर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी एचसीएसबी पाटील, पीसीएएन रामागोनट्टी व पी.सी महेश पाटील यांनी ही कारवाई केली. आरोपींला मालमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.