मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा नागरिकांना सोसावा लागत आहे. त्याचबरोबर कागल गडहिंग्लज तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने आपली हजेरी लावली आहे.
सायंकाळी कसबा बावडा, शिये परिसरात अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. यावेळी गटारी नाले ओसंडून वाहत होते तसेच शिये गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी जोरदार वाहू लागले आणि स्टेट बँक च्या शाखेतही पाणी साचले.
जर पाऊस झाल्याने अनेक नागरिकांची यावेळी तारांबळ उडाली तसेच ग्रामस्थांची देखील मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तसेच अनेक पिके देखील उभरून येत आहेत