बेळगांव:धर्मवीर संभाजी चौक येथे सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा आयोजन करण्यात आले आहे.सकाळ पासूनच धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीस आयुक्त मोठ्या फौज फाट्यासह उपस्थित आहेत.समितीच्या महामेलाव्याचा धसका पोलीस खात्याने घेतला असून शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.शहरात देखील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसेना नेत्यांना बेळगाव जिल्हयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे.