बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात भीषण परिस्थिती उद्भवली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या पेरू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हुक्केरी तालुक्यातील एलीमुनावली गावातील शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पेरूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आपल्या तीन एकर शिकतात पेरूचे पीक घेतले होते.
मात्र पावसाअभावी पेरू पूर्णपणे खराब झाले आहेत. पेरूची फळे देखील सुकली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या हा शेतकरी कर्जाच्या ओजाखाली दबला गेला आहे त्यामुळे त्याला आर्थिक त्रास सहन करावा लागतोय.
जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने तसेच कुपनलिका कोरडे पडले असल्याने शेतीला पाणी देणे देखील कठीण झाले आहे. या शेतकऱ्यांचा पेरू पिकाचे तीन लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. सरकारने आम्हाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अशा या भीषण दुष्काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची सुटका व्हावी अशी इच्छा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे