मुचंडी येथील 48 शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सुनावणी
रिंग रोड आक्षेपांची प्रांताधिकार्यांसमोर आज मुचंडी येथील 48 शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली. यावेळी शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर आक्षेपावर सुनावणी होऊन त्यांची बाजू ऐकून घेतली गेली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रास्तावित बेळगाव रिंग रोड संदर्भात प्रांताधिकार्यांनी शेतकऱ्यांच्या आक्षेपावर आज सुनावणी केली. बेळगाव रिंग रोडला तीव्र विरोध दर्शवून तालुक्यातील 32 गावातील 800 हून अधिक शेतकऱ्यांनी हे आक्षेप नोंदविले होते त्याची मुचंडी येथे आज सुनावणी पार पडली.
शेतकऱ्यांच्या रस्त्यावरच्या लढाई करिता न्यायालयीन लढायासाठी शेतकऱ्यांनी सज्ज झाले आहेत रिंग रोड विरोधात उजगाव येथील शेतकऱ्यांनी देखील लेखी आक्षेप नोंदविले आहेत. आज पाहिला डब्यात भाजी वाघवडे येथे शेतकऱ्यांनी आक्षेप दाखल केले असून सुनावणीसाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून चा विचारल्यानंतर अधिकारांकडून नेहमीच सुनावणी सुरू झाली आहे.
काल उचगाव येथील शेतकऱ्यांनी प्रांताधिकार्यांसमोर दाखल केलेल्या आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर आज मुचंडी येथील 48 शेतकऱ्यांच्या आक्षेपावर सुनावणी झाली .
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आपली मते यावेळी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडले. या सुनावणी प्रसंगी शेतकऱ्यांचे वकील एडवोकेट सुधीर चव्हाण एडवोकेट शाम पाटील ऍड एमजी पाटील ऍड महेश मोरे ऍडव्होकेट सडेकर माजी महापौर शिवाजी सुंठकर उपस्थित होते.