दारूच्या निषेध पत्नीचा केला खून: स्वतः केली आत्महत्या
हुबळीत एका व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या पत्नी आणि तीन मुलांवर प्राणघातक हल्ला केला आहे तसेच त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
फकीराप्पा मादार असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांनी दारूच्या नशेत आपली पत्नी मुडकवा हिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला त्यानंतर आपल्या तीन मुलांवर देखील हल्ला केला या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर मुले गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावेळी घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला तसेच याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत