दुचाकी समोर आलेला जलचर प्राणी कासव याला जीवदान देण्याचे कार्य ग्राम पंचायत सदस्य सुरेश राठोड यांनी केले आहे. ते एका ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीसमोर कासव आला यावेळी त्याचा प्राण वाचावा याकरिता त्यांनी ब्रेक लावला आणि त्या कासवाला आपल्यासोबत घरी आणले.
त्यानंतर त्यांनी या कासवाचे प्राण वाचावे याकरिता माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर त्या दोघांनी मिळून या कासवाला तलावामध्ये मध्ये सोडून जीवदान दिले.
प्राण्यां प्रती असणारे प्रेम या दोघांच्या कार्यामधून दिसून आले आहे.जर आपणाला ही अशा प्रकाराचे प्राणी पावसाळ्यात कुठेही दिसल्यास त्यांना जीवदान द्या आणि त्याचा समतोल राखा असे या माध्यमातून यल्लोजीराव पाटील यांनी सांगितल आहे.