अखेरचा श्वास घेतला तोही मतदान करून
शिवप्रताप गल्ली, कर्ले येथील रहिवासी असलेल्या पार्वती खेमनाळकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला होता.वयाच्या ८५ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजाविलेल्या या ज्येष्ठ महिलेचा आज हृदयविकाराने मृत्यू झाला.
आज दुपारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मुख्याध्यापक नामदेव खेमणाळकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.