बेळगाव महनगरपालिके च्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली किल्ला तलाव येथून चन्नम्मा सर्कल पर्यंत काढण्यात आली या वेळी बेळगाव शहरामधील इतर शाळांमधून आलेल्या शालेय विद्यार्थानी सहभाग घेतला होता ही रॅली *भारत माता की जय ,वंदे मातरंम, हर घर तिरंगा** आश्या घोषणा देत दिलेल्या मार्गावर हातात तिरंगा घेऊन जण जागृती करत पुढे जात होती .
या रॅली चे उ्दघाटन बेलगाम महानगर पालिकाचे आयुक्त अशोक दुडगुंडी यांचे हस्ते झाले यावेळी महापौर सविता कांबळे,उपमहापौर आनंद चव्हाण , नगरसेवक गिरीश धोंगडी,नितीन जाधव,जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर,उदयकुमार तलवार, लक्ष्मी निपानिकर,रेश्मा तलिकोटी,योगेश कुलकर्णी,विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येलुरकर तसेच बेलगाम महानगर पालिका चे आधिकरी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.