वसुंधरा किरीट्स पॅराडाईज यांच्यावतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन
वसुंधरा किरीट्स पॅराडाईज यांच्यावतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा सडेकर आणि शैलाच्या मत्तीकोप उपस्थित होत्या. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करुणा चव्हाण होत्या.
यावेळी हळदीकुंकू कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत संध्या गुरव आणि रेणुका आजरेकर यांनी केले तर अध्यक्षांचे स्वागत शितल शिंदे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना प्रतिभा सडेकर यांनी हळदी कुंकू व सणाचे महत्त्व महिलांना सांगितले तसेच स्वयंपाक घरातील अनेक पदार्थ आपल्याला दवाखान्यापासून कसे लांब ठेवतात याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्या शैलजा मतीकोप यांनी शिक्षणाचे महत्त्व महिलांना सांगितले.तसेच मातृभाषा टिकून ठेवली पाहिजे इंग्रजी भाषा आपणास प्रगत करण्यास मदत करते तसेच आपण आदर्श माता-पिता कसे बनावे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
एवढ्या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास अश्विनी चव्हाण शाळेचे चेअरमन व्हा बी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चव्हाण यांनी केले.