दीड महिन्याच्या बाळाला घेऊन थंडीमध्ये काढावी लागली रात्र
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील नागनुर गावात ही घटना घडली.फायनान्स कंपनीकडून सैदप्पा गडादी या शेतकऱ्याने ५ लाख रु कर्ज इक्वीटस स्मॉल फायनान्स कडून घेतले होते.नंतर अठरा हप्ते भरून त्यापैकी ३.१८ लाख रु कर्ज फेडले होते.त्या नंतर गेले तीन महिने हप्त्याची रक्कम फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्या कडे दिली होती.
पण त्या कर्मचाऱ्याने दिलेले तीन हप्ते भरले नाहीत असा सैदाप्पा याने आरोप केला आहे.हप्ते भरले नाहीत म्हणून कोर्टाच्या आदेशानुसार फायनान्स कंपनीने सोमवारी रात्री घर जप्त केले आणि कुलूप ठोकले.फायनान्स कंपनीच्या या माणुसकी हरवलेल्या कृत्यामुळे घरातील सामान ओसरीवर ठेऊन रात्र काढावी लागली.माणुसकी हरवलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कारवाई मुळे दीड महिन्याच्या बाळाला घेऊन बाळंतिणीला आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागली या बद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
फायनान्स कंपनीने हप्ते भरले नाहीत म्हणून घर जप्त केल्यामुळे दीड महिन्याच्या बाळासह बाळंतिणीला कडाक्याच्या थंडीत घराच्या ओसरीवर कुडकुडत रात्र काढावी लागली.