गोवा हिंदी अकादमी गोवा विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व डॉक्टर राधाकृष्णन जन्मदिनानिमित्त गुरुवंदना राष्ट्र भूषण संमेलन 2023 कोल्हापूर महाराष्ट्र येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये राजू पवार डान्स अकॅडमी, बेळगावचे श्री राजू पांडुरंग पवार, बेळगाव यांना गुरुवंदना राष्ट्रभूषण सन्मान 2023 प्रदान करण्यात आला.
रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज स्मारक दसरा चौक कोल्हापूर, महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात श्री. राजू पांडुरंग पवार यांना गुरुवंदना राष्ट्र भूषण सन्मान 2023 प्रदान करण्यात आला सदरी संमेलनाचे अध्यक्ष श्री. हनुमंत अशोक शिरगुप्पे संस्थापक अध्यक्ष चेअरमन, अनुराधा अर्बन निधी बँक, गडहिंग्लज व कार्यक्रमाचे उदघाटक माननीय धनंजय महाडिक साहेब, राज्यसभा खासदार, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत पार पडला. सदरी कार्यक्रमास माननीय श्री.शंभू भाऊ बांदेकर, माजी उपसभापती गोवा विधानसभा, माननीय प्रकाश वेळीप माजी शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, पंचायत मंत्री, गोवा राज्य, माननीय अनिल मोरे सिने अभिनेते तथा माननीय सहसचिव, ग्रामविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, माननीय सौ. रजनीताई मुरलीधर शिंदे संस्थापक अध्यक्ष वेद फाउंडेशन इचलकरंजी, माननीय सूर्यकांत सावंत उद्योजक कणकवली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदरी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व निमंत्रक मा. प्राध्यापक डॉक्टर बी. एन. खरात अध्यक्ष, विद्यार्थी विकास अकादमी व मा. सुनील शेठ अध्यक्ष, गोवा हिंदी अकादमी, गोवा राज्य हे होते.
कार्यक्रमाप्रसंगी श्री राजू पवार यांनी सिने कलावंत मेहमूद यांच्या गुमनाम चित्रपटातील हमे काले है तो क्या हुआ दिलवाले है या गाण्यावर चित्त थरारक नृत्य करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली व कौतुकाने त्यांना जूनियर मेहमूद अशी उपाधी उपस्थितांकडून मिळाली.
This is a topic close to my heart cheers, where are your contact details though?