सरकारी हायस्कूल अरळीकट्टी मध्ये गुरुवंदना व स्नेहमेळावा कार्यक्रम
बेळगांव:सरकारी हायस्कूल अरळीकट्टी येथील २००३ ते २००६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना व स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन शिवबसव कल्याण मंडप (शिवालय) बसवनगर येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरलीकट्टी मठाचे श्री.म.नी.प्रा.स्वा शिवयोगी महास्वामी यांनी भूषवले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका विमल पवार,शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका बीना डी करादगी या उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात महास्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांचा शाल व श्रीफळ जाऊन सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम विक्रम पाटील व नागराज गौडर व मित्र मंडळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. होता. एकूण ७० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमा सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
तसेच याप्रसंगी सहशिक्षक श्री मनोहर तलवार, रेणुका उप्पर, सुमथी शंकर गौडा, शिवानंद कार्की, सुरेश चन्नावार, सरोजिनी यादव, रामचंद्र हनीमानी, नागराज चक्रसाली, रवींद्र जीरागीहला, विरुपाक्षी बोलशेट्टी आणि सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.