पतंजली योग समिती तर्फे गुरुपौर्णिमा साजरी
बेळगाव: पटवर्धन ले आउट वडगाव येथे पतंजली योग समिती तर्फे गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला पतंजली योग समितीच्या कर्नाटक राज्य प्रभारी आरतीजी कानगो व अमरेंद्रजी कानगो योग गुरु स्थानी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात होम हवन व मंत्रोउपचाराने झाली. त्यानंतर 78 वयाच्या वनिता पाटील यांनी गणेश वंदना नृत्य केले. भजन, बासुरी वादन, नृत्याद्वारे ,योग प्रात्यक्षिके ,गीता पठाण ,अष्टांग योग, आयुर्वेद गुरुचे महत्व याविषयी माहिती योग साधकांनी अशा विविध प्रकारच्या सादरीकरणाने दिली.वैशाली व आरती पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंदिनी चौगुले यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता अल्प उपहारणे झाली.