भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना’छात्र अभिनंदन कार्यक्रम अपूर्व उत्साहात
बेळगाव/ भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना’ छात्र अभिनंदन कार्यक्रम रविवारी आयएम्ईआर सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत २५ शाळांच्या उत्कृष्ट शिक्षकांना शाल, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जीआयटीचे माजी प्राचार्य तसेच व्हीटीयूचे डीन डाॅ. डी. एच्. राव उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी तिगडी यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व सचिव मालतेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे विभागीय सेवाप्रमुख पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेविषयी विस्तृतपणे माहिती दिली. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी अतिथींची ओळख करून दिली. प्रमुख अतिथी डाॅ. डी. एच्. राव यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर आपले विचार मांडले. यावेळी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य विजयेंद्र गुडी यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त सपत्निक यथोचित सत्कार करण्यात आला. सहसचिव विनायक मोरे यांनी राष्ट्रगीत प्रस्तुत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरूणा नाईक यांनी केले. संयोजिका जया नायक यांनी नेटके कार्यक्रमाचे नियोजन केले. खजिनदार रामचंद्र तिगडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य व्ही. एन. जोशी, प्रा. जे. जी. नाईक, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, नामाजी देशपांडे, सुहास सांगलीकर, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, कुमार पाटील, विनायक मोरे, अमर देसाई, चंद्रशेखर इटी, पी. एम्. पाटील, पी. जे. घाडी, के. व्ही. प्रभू, सुखद देशपांडे, रजनी गुर्जर, स्नेहा सांगलीकर, जया नायक, शुभांगी मिराशी, विद्या इटी, स्मिता भुजगुरव, प्रिया पाटील, उमा यलबुर्गी, अक्षता मोरे, लक्ष्मी तिगडी, तृप्ती देसाई तसेच निमंत्रित, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.