बेळगाव: रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने “नियुक्त महिना प्रकल्प”अंतर्गत माता आणि बाल आरोग्य विषयी मार्गदर्शन पर कार्यक्रम माता आणि बाल आरोग्य विभाग वंटमुरी साईमंदिर जवळ माळमारुती बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ दयानंद धनवंत वैद्यकीय अधिकारी यु.एच.सी वंटमुरी बेळगाव यांनी मातांना मातृत्व नंतरच्या काळजी विषयी मार्गदर्शन केले. प्रचिती मुख्य वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ डॉ.हेमलता यांनी स्तनपान विषयी मार्गदर्शन केले. प्रस्तुती नंतरच्या सामान्य आरोग्य सेवे बाबत स्त्रीरोगतज्ञ डॉ निलेश यांनी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मातांना पौष्टिक किट आणि नवजात बाळांना नवजात शिशुकीचे वाटप केले. हे सर्व RTN द्वारे प्रायोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रेशमा जितुरी यांनी भूषवले होते.दर्पण अध्यक्ष रूपाली जनाज यांनी स्वागत केले.
याप्रसंगी सचिव शितल चिलामी, सर्व आर सी बी दर्पण सदस्य उपस्थित होते.