बेळगांव:सालाबाद प्रमाणे या वर्षी ही वार्षिक महोत्सवचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ईलाइट रनींग ॲकॅडमीचे संस्थापक श्री जगदीश शिंदे आणि अध्यक्ष एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री अशोक शानभाग उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य एस एन देसाई,विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर,शारिरीक शिक्षक प्रा विनय नाईक, कुमार निरंजन चिचणीकर, कुमारी तनीष्का वेलसंग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात कुमारी पावनी इरसंग यांच्या स्वागत गीताने झाली, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचा परिचय प्रा दीपक लोखंडे यांनी करूण दिला,उपस्थित मान्यवर,विद्यार्थी, प्राध्यापक यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री अशोक शानभाग यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन केले,अध्यक्ष श्री अशोक शानभाग यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले.
विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.अनिल खाण्डेकर यांनी वार्षिक अहवाल प्रस्तुत केला.
प्रमुख पाहुणे श्री जगदीश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी जीवनात संघर्ष आणि चिकाटी असल्यास सर्व काही साध्य करता येते ,जिद्द ही माणसाच्या प्रगतीसाठी गरजेची आहे , अनेक व्यक्तीनी यश प्राप्त करणेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि यश प्राप्त केले आहे.
या वार्षिक महोत्सवाचे औचित्य साधून काॅलेज मधून विविध स्पर्धेमध्ये जसे क्रिडा,संस्कृतीक,विज्ञान, सामान्य ज्ञान, आशा राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा सम्मान करण्यात आला.
या वर्षीचे उत्कृष्ट विद्यार्थी कुमार गणेश बाजीराव शिंदे आणि उत्कृष्ट विद्यार्थीनी कुमारी तनीषका कागे यांची निवड करण्यात आली.
आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी निरंजन चिचणीकर यांनी केले,पारितोषिक वितरणाचे कार्य प्रा डाॅ किर्ती फडके,प्रा जयश्री कनगुतकर , प्रा रेश्मा सपले यांनी पाहिले,सूत्रसंचालन प्रा साक्षी कुलकर्णी,प्रा शुभागी मुरकुटे,प्रा प्रज्ञा अंकलखोपे यांनी केले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताद्वारे करण्यात आली.