बेळगाव मध्ये होणार भव्य टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट
बेळगाव, : आमदार अनिल बेनके चषक निमंत्रीतांची अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारीपासून सरदार हायस्कूल मैदानावर घेतली जाणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख पाच लाख रुपये व भव्य आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला अडीच लाख रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, झेल, शिस्तबद्ध संघ, प्रत्येक संघातील सामनावीर अशी वैयक्तिक बक्षीसे देण्यात येणार आहेत. सामन्यातील मालिकावीरासाठी बक्षिसाखातर रॉयल इन्फिल्ड हंटर 350 सीसी दुचाकी दिली जाणार आहे, असे स्पर्धेबद्दल माहिती देताना आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
या स्पर्धेत पहिल्या 48 संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, दिल्ली, केरळ व गोवा येथून संघ येणार असून स्थानिक जिल्हा संघांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
क्रिकेट शौकिनांना सामने पाहण्यासाठी गॅलरीची तसेच स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही आमदार अनिल बेनके यांनी यावेळी दिली.
इच्छुक संघांनी 3 जानेवारीपर्यंत सायंकाळी 5.30 वाजे पर्यंत आपली नावे नोंदवावित असे आवाहन अनिल बेनके यांनी यावेळी बोलताना केले.