येळ्ळूर शाळेत सिरॅमिक ग्रीन बोर्डचे थाटात उद्घाटन
गुरुवार दि. 14/09/2023 रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत बेंको हैड्रोलिक्स लिमिटेड उद्यमबाग, वेळगाव या कंपनीकडून देणगीदाखल मिळालेल्या सिरॅमिक ग्रीन बोर्डचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. ‘कार्यक्रमासाठी कंपनीचे सिनियर मॅनेजर श्री अरविंद पालकर, कंपनी सेक्रेटरी सौ. अमृता तरळे, फायनान्स मॅनेजर श्री राजशेखर लक्षेट्टी कर्मचारीश्रीनागराज भेकणे, श्री परशराम पाटील, सी. आर. पी श्री महेश जळगेकर, शाळेच्या SDMC अध्यक्षा सौ.रुपा धामणेकर, माजी SDMC अध्यक्ष श्री उत्तम खेमणाकर, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ शोभा निलजकर सर्व आजी माजी SDMC सदस्य / सदस्या, शिक्षकवर्ग, विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने झाली. स्वागतगीताने उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आहे. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक वर्गातील 9 सिरॅमिक ग्रीन बोर्डचे उद्घाटन झाले. प्रत्येक वर्गात ग्रीन बोर्डची सुंदर सजावट केली होती. पाहुण्यांचे शाल, स्मृतीचिन्ह, आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर उपस्थितांची भाषणे झाली. शाळेचा इ. 4 थी या विद्यार्थी गणराज परशराम पाटील यांने कंपनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कंपनीचे सिनियर मॅनेजर श्री अरविंद पालकर सरांनी आपल्या भाषणामध्ये कंपनी- बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि शाळेचे तोंडभरुन कौतुक केले.
शाळेचे माजी SDMC अध्यक्ष श्री उत्तम खेमणाकर, CRP श्री महेश जळगेकर, माजी SDMC सदस्य श्री परशराम पाटील, SDMC अध्यक्षा सौ रुपा धामणेकर यांची कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रभारी मुख्याध्यापिका सौ एस. आर. निलजपुर, -यांनी केले. सुत्रसंचालन श्री एस. बी. पाखरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत सौ. ए. वाय. मेणसे यांनी केले. तर सौ. एस्. एस्. बाळेकुंद्री यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचा सर्व शिक्षकवर्ग, आजी-माजी SDMC सदस्य/सदस्या, विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले .