**कडोली गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती परिसरात अस्वच्छता व दारू पिण्याची घटना; ग्रामपंचायतीकडे मागणी**
कडोली: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती परिसरात अस्वच्छता पसरल्याचे आणि काही समाजकंटकांनी दारू पिऊन पाकिटे मूर्तीच्या परिसरात टाकल्याचे आरोप समोर आले आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडून तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठांच्या धारकऱ्यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या परिसरात अस्वच्छता आणि दारू पिण्यासारख्या घटना घडणे हा समाजाच्या संस्कृतीचा अपमान आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.”
ग्रामपंचायतीकडून या घटनेकडे तातडीने लक्ष देऊन मूर्ती परिसर स्वच्छ करण्याची व या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनीही या प्रकरणी गंभीर भूमिका घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. छ.शिवाजी महाराज मूर्तीच्या परिसरातील पवित्रता राखणे हे प्रत्येकाचा कर्तव्य आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.*वादावादी भाषिक रंग देऊन वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी*
ग्रामपंचायतीकडून या प्रकरणी लवकरच योग्य कारवाई करण्याची अपेक्षा आहे.