चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !- हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निपाणी येथे निवेदन
निपाणी – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती वतीने 10 डिसेंबर या दिवशी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. हे निवेदन तहसीलदार मुज्जफर बाळीगार यांनी स्वीकारले.
या वेळी श्रीरामसेना कर्नाटकचे निपाणी तालुकाप्रमुख श्री. बबन निर्मळे, श्रीराम सेना कर्नाटकचे श्री. अमोल चेंडके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निगोंडा पाटील आणि श्री. अनिल बुडके, सनातन संस्थेचे श्री. अशोक नाईक, हिंदुत्वनिष्ठ श्री. संतोष मोरे, श्रीराम सेनेचे श्री. दीपक बुदीहाळे, श्री. अविराज शहा, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेश आवटे, ‘हिंदू हेल्प लाईन निपाणी’चे श्री. सागर श्रीखंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सचिन चौगुले आणि श्री. शिवगोंडा पाटील, अजित पाटील , संतोष मोरे ,यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूंवर होणार्या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले. त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन दरम्यान अधिकार असो धिक्कार असो बांगलादेश सरकारचा अधिकार असो, जय श्रीराम जय जय श्रीराम अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी काळेफित बांधून बांगलादेश सरकारचा निषेध केला.