*संजीवीनी वृद्धांना आधार मासिक रेशन सपोर्ट योजना सलग दोन वर्षानंतरही सुरूच..**गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई कत्तलीपासून दहा नंदी (गोवंश) यांना जीवदान*
श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग स्वामीजी यांना स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्र मधून कर्नाटक मध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गोवंश यांना जीवदान देण्यात आले.
पेठ वडगाव येथून कत्तलीसाठी दहा बैल घेवून जाणार आहेत अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्यान अधिकारी साईनाथ जाधव यांच्या कडून मिळाली की पेठ वडगाव येथून कत्तली साठी बेकायदेशीररित्या MH-10 AW 8107 या आयशर गाडी मधून मोठ्या प्रमाणात गोवंश जाणार आहे.कर्नाटक येथे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करणारे गाडी गोरक्षण सेवा समतीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आले. याप्रकरणी संशयीताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यावेळी प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केला यावेळी गोरक्षक सागर श्रीखंडे यांनी कागल RTO चेक पोस्ट सापळा रचून येथे ही गाडी पकडण्यात आली याप्रकरणी संशयीताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत गोरक्षण सेवा समिती चे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उड़वा उडवीची उत्तर मिळाल्याने ११२ नंबर हेल्पलाईनला कॉल करून आयशर वाहन पोलिसांच्या स्वाधीन केली गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले.ताब्यात घेतलेले सर्व गोवंश श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले. यावेळी गोसेवा समिती निपाणी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. याबाबत कागल पोलीस स्थानकात गाडी चालक दुर्गेश शंकर जाधव रा.संत रोहिदासनगर पेठनाका वाळवा, इस्लामपूर-सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षिका करीत आहे.
यावेळी मानद पशुकल्यान अधिकारी साईनाथ जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा खानापूर येथील गोरक्षक साईनाथ जाधव, महेश बाबर, अतुल जाधव, पोपट जाधव, निलेश जाधव, शिवम निकम, मकरंद पेडणेकर, गोरक्षण सेवा समिती चे कागल येथील ओंकार त्रिगुणे, समरजीत जाधव,कोगनोळी येथील सागर कळेकर, नितीन परिट यांनी ही कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.