गोरक्षण सेवा समिती यांनाची कागल येथे मोठी कारवाई
चिकोडी येथे कत्तली साठी जाणारा 10 गोमाता व गोवंशला गोरक्षकांचा मदतीने कत्तली पासून जीवदान
चिकोडी येथे कत्तल करण्यासाठी चार गोमाता बेकायदेशीररित्या वाहतूक करणारे टेम्पो आणि सहा गोवंश वाहतूक करणारे बोलुरो पिकाप गोरक्षण सेवा समतीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आले. याप्रकरणी संशयीताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटना कागल निपाणी मार्गावर राजे बँक समोर रात्री 11. वाजता तर दुसरी गाडी शेंडूर फाटा येथे पहाटे 5वाजता पकडण्यात आली.
याबाबत गोरक्षण सेवा समिती चे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताने पेट वडगाव हून चिकोडी येथे कत्तली साठी इंट्रा पिक (वाहन क्रामका MH -45AF 8865)व बोलेरो पिकअप (वाहन क्रमांक MH-09em3053)वाहनातून गोमाता व गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती निपाणी येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथील प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना दिली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांना योग्य त्या गोरक्षकाना सूचना देवून कारवाई करण्याचा आदेश दिला यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चोकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उड़वा उडवीची उत्तर मिळाल्याने ११२ नंबर हेल्पलाईनला कॉल करून बोलेरो वाहन पोलिसांच्या स्वाधीन केली गोमाता आणि गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले.
ताब्यात घेतलेले सर्व गोमाता आणि गोवंश श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले. यावेळी गोसेवा समिती निपाणी कागलचे ओंकार त्रिगुणे,समर्जित जाधव,अथर्व करंजे,प्रेम त्रिगुने,सोहम किंकर,विशाल मर्दाने ,नितीन परीट ,सागर कोळेकर ,लगमान कोळेकर
अभिषेक करंजे ,केतन कदम,प्रणव माळी,पार्थ जाधव,प्रणव भिवसे,अविरज बागल सह कसबा सांगाव, यळगुड, हुपरी, कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. याबाबत कागल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षिका करीत आहे