अयोध्या श्रीराम मंदिराचे प्रभारी गोपाजी शनिवारी बेळगावात
बेळगाव-अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर अनावरणास येत्या 22 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बेळगावात गेल्या 11 जानेवारीपासून सुरू असलेल्या हनुमान चालीसा उत्सवात सहभागी होण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे प्रभारी श्री गोपाजी हे शनिवारी सायंकाळी बेळगावात दाखल होत आहेत.
यानिमित्त गेल्या 11 जानेवारीपासून रोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत गुडशेड रोड ,शास्त्रीनगर येथील समरसता भवनांमध्ये अकरा वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण सुरू आहे. 22 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या भक्ती यज्ञामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.