विद्यार्थ्यांना खुशखबर : बेळगावात ” वेरांडा रेस कोचिंग सेंटर ” सुरु : आज करण्यात आले केंद्राचे थाटात उदघाटन
बेळगाव, दिनांक 1 :” वेरांडा ” हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीचा व्यासपीठ असल्याचे गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि माजी आमदार संजय पाटील म्हणाले. गुणवत्ता असली तरी ती पारखून, त्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी एखादं माध्यम हवं असतं आणि हे माध्यम ” वेरांडा ” नक्कीच बनेल, असेही संजय पाटील म्हणाले.
गोवावेस रिलायन्स पेट्रोल पंपानजिक युनियन बँकेच्या वरील मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या ” वेरांडा रेस कोचिंग सेंटर ” या बँकिंग, एसएससी आणि रेल्वे भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात माजी आमदार संजय पाटील बोलत होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून संजय पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील उपस्थित होते. यावेळी वेरांडा रेस कोचिंग सेंटरचे कर्नाटक राज्य प्रादेशिक व्यवस्थापक प्रदीप नायर, शिवराज बसगुंडे व्यासपीठावर उपस्थित होते. शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन संजय पाटील व शंकरगौडा पाटील यांचा सेंटरच्यावतीने सन्मान करण्यात आला.
प्रारंभी संजय पाटील आणि शंकरगौडा पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर रेणुका सुळेभावीकर व नंदा शहा यांच्या हस्ते श्री सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर बोलताना आमदार संजय पाटील यांनी, विद्यार्थ्यांच्या करिअर संकल्पपूर्तीचा मार्ग म्हणजे ” वेरांडा ” असल्याचे म्हटले.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना दिशाहीन होऊ नये. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून केवळ मौज मजा कराल तर भविष्यात नक्कीच सजा भोगावी लागेल. यासाठी मनःपूर्वक अभ्यास करा, करिअर घडविण्याच्या अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न करा, अस सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
आज गुणवत्तेला पर्याय नाही. यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घ्या. वेरांडा रेस कोचिंग सेंटर सारख्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊन बँकिंग रेल्वे आधी खात्यामध्ये नोकरी मिळवा आणि आर्थिक रित्या सक्षम बना असेही शंकरराव पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
बेळगाव वेरांडा रेस कोचिंग सेंटरचे संचालक दत्ता सुळेभावीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रमोद कोळी आणि जस्टीन पॉल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, ग्रीन ग्लोबलचे जिल्हाध्यक्ष सचिन गोरले यासह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.