अक्कोळ येथे कोल्हापूर जिल्हा पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री मा.श्री.प्रकाश आनंदराव आबिटकर (रा.भुदरगड) यांची अक्कोळ येथे सदिच्छा भेट.
सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचे वंशज व दत्त संस्थान ट्रस्टी डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन पंतप्रतिमेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी आ.प्रकाशराव आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून नेमणूक झाल्याबद्दल डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्याकडून यथोचित शाल- श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्रातील व भुदरगड तालुक्यामध्ये विविध योजना मंदिर अनुदान, सर्वसामान्याना सर्वोत्तम आरोग्य सुविधा व निरंतर समाज उपयोगी सेवा, प्रभावी कार्यशैली असणारा युवा नेता म्हणून आरोग्यमंत्री श्री प्रकाशराव आबिटकर यांची ओळख आहे. मंत्र्यांचे लहान भाऊ व कोल्हापूर डीसीसी बँकेचे संचालक प्रा.श्री.अर्जुन आबिटकर यांनी सुध्दा काही महिन्यापूर्वी डॉ.संजय पंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती.
अकोळ ग्रामपंचायत मार्फत अध्यक्ष श्री. इंद्रजीत सोळांकुरे, श्री वीरेंद्र पाटील, श्री रणजीत सदावर्ते व ग्रामपंचायत सदस्यांमार्फत स्वागत व सत्कार करण्यात आला. https://dmedia24.com/rangpanchami-enthusiasm-in-the-yelur-area/
या भेटी प्रसंगी श्री योगेश पाटील (बारवे),चंद्रकांत सुतार (गारगोटी), अनंत पवार (लिंगनूर)श्री. रामनारायण कुलकर्णी ,श्री दिलीप सदावर्ते, आप्पासो चिंचवाडे, रमेश कुलकर्णी, चंद्रकांत पाटील(कौलगे), सागर शिंदे (भुदरगड), अरुण दाभोळे (वाघापूर)श्रीपती सुर्यवंशी, इ .नागरिक उपस्थित होते.