*पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सत्कार*
_मार्केट यार्ड एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पी एस आय त्रिवेणी मॅडम यांची नुकताच डी.जी ऑफिस बेंगलोर येथे बदली झाली त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत सदस्य कंग्राळी खुर्द यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
मागील तीन वर्षापासून एपीएमसी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पीएसआय म्हणून काम पाहताना त्यांनी कंग्राळी खुर्द गावातील बऱ्याचशा समस्या सोडविल्या व वेळोवेळी गावातील नागरिकांना जागृत करण्याचं काम देखील त्रिवेणी मॅडम यांनी केलं होतं यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक कम्मार,प्रशांत पाटील,वैजू बेन्नाळकर तसेच भूषण तमन्नाचे व अन्य उपस्थित होते._