अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेकडून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या तसेच जय भारत फाउंडेशन व रोटरी क्लब बेलगाम इलाईट यांनी पुरस्कृत केलेल्या गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम सुपर सिंगर सीजन 2 तसेच गोल्डन व्हाईस ऑफ बेलगाम लिटिल चॅम्प्स सीजन 2 स्पर्धेची मेगा फायनल 27 एप्रिल 2025 रोजी पार पडली या स्पर्धेत संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता . या स्पर्धेत बेळगावची मानसी गेंजी ही गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स 2025 या किताबाची मानकरी ठरली तसेच खानापूर तालुक्याची कन्या काजल पाटील ही या स्पर्धेमध्ये गोल्डन वाईस ऑफ बेळगाव सुपर सिंगर 2025 या किताबाची मानकरी ठरली. तर स्वामिनी शहापूरकर ही या स्पर्धेतील लहान गटातील सेन्सेशनल सिंगल ठरली.
तर मोठ्या गटामध्ये भुजंग पाटील हे या स्पर्धेतील सेन्सेशनल सिंगल ठरले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गोल्डन व्हाईसर बेळगाव लिटल चॅम्प्स 2025
प्रथम क्रमांक – मानसी परशराम गेंजी.
द्वितीय क्रमांक – धन्या पाटील.
तृतीय क्रमांक – निधी गुडमेट्टी.
चतुर्थ क्रमांक – शशीप्रिया सिंगबल पाचवा क्रमांक – गौरी अंगडी.
तसेच स्वामिनी शहापूरकर ही या गटातील सेन्सेशनल सिंगर या किताबाची मानकरी ठरली.
गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगाव सुपर सिंगर 2025
प्रथम क्रमांक – काजल पाटील.
द्वितीय क्रमांक – काजल धामणेकर.
तृतीय क्रमांक – दर्शन पदकी.
चतुर्थ क्रमांक – श्रेया हेरकल.
पाचवा क्रमांक – जकी मुल्ला.
तसेच भुजंग पाटील हे या गटात स्पर्धेतील सेन्सेशनल सिंगर या किताबाचे मानकरी ठरले.
यावेळी अस्मिता क्रिएशन या चित्रपट संस्थेचा हेल्मेट वापरण्याबाबत जागृती करण्यासंदर्भातला “मेरी जिंदगी जिम्मा”हा हिंदी लघुपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव वाहतूक विभागाचे एसीपी निकम सर, जय भारत फाउंडेशन चे श्री बसनगौडा पाटील सर, रोटरी क्लब बेलगाम इलायटची अध्यक्ष श्री सचिन हंगरगेकर साहेब. सेक्रेटरी सुनील मुरकुंबे, शहापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री गिरीश धोंगडी, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मीना बेनके, बेळगाव डिस्टिक बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स चे कार्याध्यक्ष व कर्नाटका स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स चे सेक्रेटरी श्री अनिल अंबरोळे. जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्री सुधाकर चाळके, समाजसेवक विकास कलघटगी, दडपण चित्रपटाचे मुख्य अभिनेते शशिकांत नाईक, अन्वर साहब जारी, अस्मिता क्रिएशनचे मेंबर रतन मुचंडीकर इत्यादी मान्यवर व अस्मिता क्रिएशनचे सर्व कलाकार उपस्थित होते. अस्मिता क्रिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष राजेश लोहार व उपाध्यक्ष राजेंद्र जैन यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सौ कल्याणी कोटारे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी अस्मिता क्रिएशनचे राजेश लोहार राजेंद्र जैन व लेखक दिग्दर्शक संतोष सुतार , पवन हसबे, तेजस्विनी कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सोनाली पाटील हिच्या सुंदर सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची गोडी वाढवली. संतोष सुतार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.